माय डियर फ्रेंड!... ब्राझीलमध्ये निवडणूक जिंकताच लूला यांना PM मोदींचा मेसेज, राष्ट्रपती झाल्याबद्दल केलं अभिनंदन

PM Modi Congratulates Lula da Silva ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक नुकतीच झाली. यात पुन्हा एकदा राष्ट्रपती झाल्याबद्दल लूला दा सिल्वा यांचे अभिनंदन करणारी पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केलीय.
PM Modi Congratulates Lula da Silva

PM Modi Congratulates Lula da Silva

Esakal

Updated on: 

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लुइज इनासियो लुला दा सिल्वा यांनी पुन्हा विजय मिळवलाय. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुला दा सिल्वा यांचं अभिनंदन केलंय. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी पोस्ट करत लुला दा सिल्वा यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी लुला यांचा उल्लेख ‘माय डियर फ्रेंड’ असा करत लुला दा सिल्वा यांचे फेरनिवडीबद्दल अभिनंदन केलं. भारत-ब्राझीलमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्यासाठी लुला यांच्यासोबत काम करण्याची अपेक्षा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com