PM मोदींच्या मतदारसंघातच 'ड्राय रन'ची पोलखोल; लसीकरणाच्या पूर्वतयारीचा फज्जा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 6 January 2021

देशातील दोन कोरोना लशींना मंजुरी मिळाल्याने आरोग्य मंत्रालयाने लसीकरण मोहिमेची जोरदार तयारी चालवली आहे

नवी दिल्ली- देशातील दोन कोरोना लशींना मंजुरी मिळाल्याने आरोग्य मंत्रालयाने लसीकरण मोहिमेची जोरदार तयारी चालवली आहे. अनेक राज्यामध्ये लसीकरणाचे ड्राय रन पार पडत आहे. प्रत्यक्षातील लसीकरणापूर्वीची ही रंगीत तालीम असून राज्यातील ड्राय रन यशस्वी होत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाकडून केला जात आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातच ड्राय रनचा फज्जा उडाला आहे. 'न्यूज 18' ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नीरव मोदीनं आयुष्य उद्धवस्त केलंय, त्याच्याविरोधात साक्ष देणार; बहिणीची कोर्टात...

लसीकरणादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, तसेच लसीकरणाची पूर्ण योजना तयार असावी यासाठी ड्राय रन घेतले जाते. पण, मोदींच्या मतदारसंघात लसीकरणाची तयारी किती तोकडी आहे, याचे दर्शन झाले आहे. वाराणसीमध्ये आरोग्य कर्मचारी चक्क सायकलीवरुन कोरोनाची लस घेऊन आला होता. ड्राय रनदरम्यानचा हा प्रकार पाहून अनेकांचा गोधल उडाला. लसीकरणाची तयारी करण्यात आली होती, पण हॉस्पिटलमध्ये लस कशी पोहोचवायची याचाच विसर प्रशासनाला पडल्याचं दिसलं. 

वाराणसीमधील चौकाघाट कोरोना लसीकरण केंद्र असणाऱ्या महिला रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. कोरोना लशीला एका विशिष्ठ तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे ती शीतगृहात ठेवणे आणि ती वेळेत इच्छित स्थळी पोहोचवणे महत्वाचे असते. वाराणसीतील चौकाघाट केंद्रातील ड्राय रन केवळ नावापूरताच घेण्यात आल्याचं दिसलं. आरोग्य कर्मचारी चक्क सायलकीवरुन कोरोना लस घेऊन पोहोचला. त्यामुळे प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

सेक्रेड गेम्सचा तिसरा सिझन येणार? ; गणेश गायतोंडेनं केला खुलासा

वाराणसीचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. बी. सिंह यांनी लस सायकलवरुन पोहोचल्याचं मान्य केलं. पाच केंद्रावर लस व्हॅनच्या साहाय्याने पोहोचवण्यात आली, केवळ चौकाघाट केंद्रावर लस सायकलीने पोहोचवण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सहा ठिकाणी ड्राय रनचे नियोजन करण्यात आलं आहे. ड्राय रनमध्ये प्रत्यक्षात लस दिली जात नाही, केवळ लसीकरण सुरु झाल्यास अडचणी निर्माण होऊन नये यासाठी रंगीत तालीम घेतली जाते. केंद्रावर लस पोहोचणे, ती योग्य ठिकाणी ठेवणे, तिचा पुरवढा करणे, लोकांना लशीचा डोस देणे अशा गोष्टींचा अभ्यास केला जातो. पण, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात लसीकरणासंदर्भातील पूर्वतयारीची अनेक ठिकाणी पोलखोल झाली आहे. 

दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताला दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यावी अशी शिफारस कोरोना लशीसंबंधी तज्ज्ञ समितीने केली होती. त्यानंतर 3 जानेवारीला भारताच्या डीसीजीआयने लशीला मंजुरी दिली. याकाळात भारतात लशीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. आता 13 जानेवारीपासून देशातील कोरोना वॉरियर्संना लस दिली जाण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi constituency Varanasi COVID19 vaccine was transported to a hospital on a bicycle