सेक्रेड गेम्सचा तिसरा सिझन येणार? ; गणेश गायतोंडेनं केला खुलासा

sacred games season 3
sacred games season 3

मुंबई - भारतीय वेबमालिकेच्या दुनियेत ज्या काही लोकप्रिय मालिका आहेत त्यात सेक्रेड गेम्सचा नंबर अव्वल आहे. या मालिकेनं लोकप्रियतेचे अनेक विक्रम केले. ज्यावेळी ही मालिका प्रदर्शित झाली होती तेव्हा लाखोच्या संख्येनं त्याचे प्रेक्षक होते. देशातील आतापर्यतची सर्वाधिक हिट मालिका म्हणूनही सेक्रेड गेम्सचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर किमान वर्षभराच्या कालावधीनंतर या मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. आता त्याच्या तिस-या भागाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सेक्रेड गेम्सचा तिसरा आणि शेवटचा सिझन कधी प्रदर्शित होणार याबाबत या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता नवाझुद्दीन सिध्दिकी यानं माहिती दिली आहे. नवाझुद्दीनी साकारलेलं गणेश गायतोंडे नावाची भूमिका कमालीची लोकप्रिय झाली होती. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे सोशल मीडियाच्या ट्रेडिंगचा विषय झाला होता. मात्र आता गणेशनं मालिकेच्या तिस-या भागाबद्दल जो खुलासा केला आहे त्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. सरताज सिंग म्हणजेच सैफ अली खान मुंबई शहर वाचवणार का? गणेश गायतोंडे याच्या कथेचं पुढे काय झालं असे अनेक प्रश्नांची उत्तरं अजुन मिळालेली नाहीत. अनेकांना सेक्रेड गेम्सचा भाग ३ येणार असे वाटत आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना नवाझुद्दीन सिध्दीकी म्हणाला,  पहिल्या सीजनच्या तुलनेत दुसरा सीझन यशस्वी न झाला नाही.  पहिला सीझनमध्ये जसा आशय होता तसा तो दुस-या भागामध्ये उतरला नाही.  त्यामुळे आता या मालिकेचा 'तिसरा सीझन येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण कादंबरीच्या आधारे जे म्हणायचं होतं ते आम्ही दोन सीझनमध्ये सांगितलं. आता विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीत काहीच शिल्लक नाही. त्यामुळे सीझन तीनमध्ये काय दाखवणार हा प्रश्न आहे.' 

एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नवाजनं सेक्रेड गेम्स विषयी सांगितले, 'ज्या प्रकारे सेक्रेड गेम्सचे जगभरात कौतुक झाले, त्याची कुणीच कल्पना केली नव्हती. मला आठवतं की मी रोममध्ये तनिष्ठा चॅटर्जीच्या सिनेमाचं चित्रीकरण करत होतो. तिथे बरेच लोक सेक्रेड गेम्सविषयी बोलत होते.'सेक्रेड गेम्स' या सीरिजमध्ये कोणा एका व्यक्तीची सर्वात जास्त कोणत्या भूमिकेचं कौतुक झालं असेल तर ते म्हणजे गणेश गायतोंडे या भूमिकेचं. या सीरिजमधलं त्याची गणेश गायतोंडे ही व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली होती. गणेशचे अनेक संवाद लोकांच्या तोंडी होते. पण या साऱ्याचं श्रेय  लेखकाला द्यायला हवे. 'भारतात अनेकदा यशस्वी संवादाचं श्रेय कलाकाराला दिलं जातं. पण त्याचं श्रेय लेखकाचं आणि ज्यांनी संवाद लिहिले त्यांचं आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com