pm modi constitution day
esakal
गरीब कुटुंबातून येणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचता आलं. हे फक्त संविधानामुळे शक्य झाले, असं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं आहे. आज देशभरात संविधान दिन साजरा केला जातो आहे. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी ब्लॉग लिहीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ब्लॉगमध्ये त्यांनी नुकताच १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनाही मोठं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी संविधान दिनानिमित्तची एक जुनी आठवणही सांगितली.