

PM Modi Departs for Europe, Rafale Talks in Focus
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या सहा दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले. १५ जूनपासून फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या तीन दिवसीय जी७ शिखर परिषदेत ते भाग घेणार आहेत. यावेळी काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकही होणार आहे. भारत भागिदार म्हणून जी ७ शिखर परिषदेत तेराव्यांदा सहभागी होत आहे. फ्रान्सच्या कंपनीसोबत होणाऱ्या राफेल करारावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करू शकतात. हा करार आणखी वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.