काँग्रेसला मजबूत करण्यामध्ये अहमद पटेलांची महत्त्वाची भुमिका; PM नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

modi pm
modi pm

नवी दिल्ली : काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे 3:30 वाजता निधन झालं. कोरोना संक्रमित झाल्यामुळे त्यांच्यावर हरयाणातील गुरुग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांचं वय 71 वर्षे होतं. त्यांच्या या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे भरुन न येणारे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, अहमद पटेलजी यांच्या निधनामुळे मी शोकाकूल आहे. त्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात समाजाच्या सेवेत घालवली आहेत. त्यांच्या प्रगल्भ विचारांनी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यामध्ये त्यांची असलेली भुमिका नेहमी लक्षात ठेवली जाईल. त्यांचे पुत्र फैझल यांच्याशी बोललो आणि माझ्या सहवेदना व्यक्त केल्या. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो.


काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेत्याच्या निधनावर पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी , यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्तकेलाय. अहमद पटेल हे पक्षाचा मजबूत स्तंभ होते. सर्वात कठिण काळात ते पक्षासोबत उभे राहिले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  

अहमदजी एक चांगले आणि अनुभवी सहकारी होते. त्यांच्याकडे मी नेहमी सल्ल्या घेण्यासाठी जायचे. ते एक मित्र होते जे नेहमी आमच्यासोबत स्थिर, एकनिष्ठ आणि शेवटपर्यंत विश्वासार्ह होते. त्यांच्या अशा जाण्याने अफाट अशी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्याला चिर:शांती लाभो. 

अहमद पटेल हे काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. पक्षासाठी त्यांनी दिलेलं योगदान वादातीत होतं. 1 ऑक्टोबर रोजी ते कोरोना संक्रमित आढळल्यावर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. मागील एक महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र फैझल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com