मोदींनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या चक्क मराठीतून!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 12 जुलै 2019

- आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त ट्विटवरून शुभेच्छा दिल्या. त्यांनी चक्क मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा, असे त्यांनी ट्विटरवरून सांगितले. तसेच त्यांनी पालखी सोहळ्याचा व्हिडिओही ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.  

मोदींनी ट्विट करून सांगितले, की सभी देशवासियों को आषाढ़ी एकादशी और चातुर्मास की हार्दिक शुभकामनाएं। आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना!

 

तसेच बिग बी अमिताभ बच्चन यांनीदेखील मराठी भाषेत ट्विट करत आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा असे सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi give good wishes of Ashadhi Ekadashi in Marathi