मोदी लोकांना खोटी आशा दाखवत आहेत: काँग्रेस

वृत्तसंस्था
रविवार, 25 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांना खोटी आशा दाखवत असल्याचा आरोप काँग्रेस ने केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांना खोटी आशा दाखवत असल्याचा आरोप काँग्रेस ने केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस चे नेते राजीव शुक्‍ला म्हणाले, "नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून सुटका होण्याची लोक आणखी वाट पाहात आहेत. त्यांनी अशा पद्धतीने नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे की, हा विषय पन्नास दिवसांत संपू शकत नाही. अनेक लोक सध्या रांगेत उभे आहेत. सरकार त्याची अचूक नोंद ठेवण्यातही अपयशी ठरले आहे. ते काळ्या पैशाविरुद्ध बोलत आहेत. मात्र अद्यापही काळा पैसा अस्तित्वात आहे. भारतीय अर्थव्यवस्था मंदावली असून लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत.'

"सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र देशातील बेईमानांची खैर नाही', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना मुंबईतील अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना इशारा दिला.

Web Title: PM Modi gives false hope : Congress