मोदींनी मंदिरात नेले डिजीटलायझेशन; पूजेचे पैसे डिजीटल पेमेंटने  

सकाळ न्युज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

कोची: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) केरळमधील त्रिसूर येथील गुरुवायूर मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी मोदींची कमळांच्या फुलांसोबत तुला करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी मंदिराला काही रक्कम दान देऊ केली आहे. ती 39,421 रुपयांची रक्कम डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मंदिराला देण्यात आली. मोदी सरकारने सुरुवातीपासूनच डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी काही योजना देखील आणल्या होत्या. डिजिटल व्यवहार लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना सुरु केल्या आहेत. यातील डिजिटल व्यवहार योजना सामान्य ग्राहकांसाठी तर डिजिधन व्यापार योजना व्यापारी आणि दुकानदारांसाठी आणली होती. 

पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदींचा हा पहिलाच केऱळ दौरा आहे. पाच हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात मोदींनी आज सकाळी पूजा केली. तेथून ते दुपारी मालदिव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना होतील. मोदींचा हा पहिला परदेश दौरा असेल.

गुरुवायूर मंदिर हे पाच वर्षे जुने आहे. 1638 मध्ये या मंदिराचे पुननिर्माण करण्यात आले होते. या मंदिरात फक्त हिंदूच पूजा करू शकतात. इतर धर्मियांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. गुरुवायूर देवस्थानचे अध्यक्ष के. बी. मोहनदास यांनी मोदींची कमळांच्या फुलांसोबत तुला करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मोदींची फुलांसोबत तुला करण्यासाठी 112 किलो फुलांचा वापर करण्यात आला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi goes digital to offer pooja at Guruvayur temple