PM Modi greeting: PM मोदींकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा अन पद्म पुरस्कार्थींचं अभिनंदन; म्हणाले, जनतेला...

देश आज ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.
PM Modi addresses nation on International Yoga Day
PM Modi addresses nation on International Yoga Day
Updated on

75th Republic Day : देश आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पद्म पुरस्कार मिळालेल्या मान्यवारांचं त्यांनी अभिनंदही केलं आहे. या निमत्त त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. (pm modi greeting on the occasion of 75 th republic day and congratulations to the padma awardees)

पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना ट्विट करत म्हटलं की, "देशातील आपल्या सर्व कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद" तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या मान्यवरांचंही त्यांनी काही तासांपूर्वी ट्विट करुन म्हटलं, "पद्म पुरस्कारानं सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन. भारत विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानाची कदर करतो. ते त्यांच्या असामान्य कार्याने लोकांना प्रेरणा देत राहोत, हीच अपेक्षा" (Marathi Tajya Batmya)

कर्तव्यपथावर प्रमुख सोहळा

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख सोहळा दिल्लीतील कर्तव्य पथावर पार पडणार आहे. या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन होईल. जिथे ते शहीद झालेल्या वीरांना देशवासियांच्यावतीनं पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान आणि इतर मान्यवर भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घेण्यासाठी कर्तव्यपथावरील अभिवादन मंचाकडे जातील. (Latest Marathi News)

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष असणार प्रमुख पाहुणे

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 95 सदस्यीय मार्चिंग तुकडी आणि फ्रान्समधील 33 सदस्यीय बँड तुकडीही या परेडमध्ये सहभागी होणार आहे. फ्लाय-पास्टमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांसह, एक मल्टी-रोल टँकर ट्रान्सपोर्ट (MRTT) विमान आणि फ्रेंच हवाई दलाची दोन राफेल विमाने सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com