येशू ख्रिस्तांची उदात्त शिकवण आठवतेय, मोदींनी दिल्या नाताळाच्या शुभेच्छा

PM Narendra Modi
PM Narendra ModiTeam eSakal

नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉनच्या (India Omicron Cases) संकटामुळे सार्वजनिक ठिकाणी निर्बंध आहेत. त्यातच ख्रिसमस साजरा (Christmas Celebration) केला जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) देखील ट्विट करून सकाळी सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi
होय! गाय आमच्यासाठी माता; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना जोरदार सुनावलं

"सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा! आज आम्हाला येशू ख्रिस्तांचे जीवन, उदात्त शिकवण आठवते. त्यांचे जीवन नेहमीच सेवा, दयाळूपणावर आधारित होते. प्रत्येकजण निरोगी आणि समृद्ध होवो. आजूबाजूला एकोपा नांदू दे,” असे ट्विटपंतप्रधान मोदींनी केले.

सध्या देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ख्रिसमस, नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या समारंभांमधील उपस्थितीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

ओमिक्रॉनच्या उद्रेकामुळे अनेकांनी फिरण्याचे प्लॅन देखील रद्द केले आहेत. एका संकेतस्थळानुसार, जगभरात २३०० हून अधिक लोकांनी त्यांच्या विमानाच्या तिकीट रद्द केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com