चुकीला माफी नाहीच; मोदींकडून 'या' खासदाराकडे दुर्लक्ष

वृत्तसंस्था
रविवार, 26 मे 2019

लोकसभा निवडणुकीत आक्षेपार्ह बोलण्याने चर्चेत आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानांनी भाजपला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत आक्षेपार्ह बोलण्याने चर्चेत आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानांनी भाजपला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी मोदींनी मात्र नवनिर्वाचित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे काना डोळा केले असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे राजकीय वर्तुळाता मोदींनी अजूनही ठाकूर यांना माफ केले नसल्याची चर्चा सुरू आहे.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी आयोजित भाजप संसदीय मंडळ आणि ‘एनडीए’च्या घटक पक्षांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या (रालोआ) नेतेपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली. त्यावेळी  साध्वींनी मोदींना अभिवादन केले. मात्र, मोदींनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. लोकसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदार संघात भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे, बाबरी मस्जिद आणि नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधाने केली होती.

मोदी यांनी शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नवनिर्वाचित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर घेतलेलही ही अप्रत्यक्षपणाची भूमिका म्हणजे प्रज्ञासिंहाना माफी नाही असेच दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi ignore Pragya Singh Thakur at Central Hall