esakal | कोरोना लढ्यात UP एक नंबर; इथं कायद्याचं राज्य, मोदींनी केले योगींचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

'कोरोना लढ्यात UP नंबर वन, इथं कायद्याचं राज्य'

पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

'कोरोना लढ्यात UP नंबर वन, इथं कायद्याचं राज्य'

sakal_logo
By
सूरज यादव

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांनी 1583 कोटी रुपयांच्या विकास योजनांचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या काळात केलेलं काम हे उल्लेखनिय असून देशात सर्वाधिक लसीकरण आणि कोरोना टेस्ट उत्तर प्रदेशात झाल्याचं मोदींनी म्हटलं.

मोदी म्हणाले की, मी इथल्या सहकाऱ्यांचे, प्रशासन, सरकार आणि कोरोना योद्ध्यांचे आभार मानतो. दिवसरात्र एक करून इथं व्यवस्था उभारलीत ही मोठी सेवा आहे. देशातील सर्वात मोठं राज्य ज्याची लोकसंख्या जगातील अनेक मोठ्या देशांपेक्षाही जास्त असेल अशा ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट यशस्वीपणे थोपवली. कोरोनाचा संसर्ग रोखलात हे अभूतपूर्व आहे अशा शब्दात मोदींनी कौतुक केलं.

हेही वाचा: देशद्रोह कायद्याची गरज आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

योगींचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशला मॉडर्न करण्यासाठी योगींनी झटपट पावलं उचलली. राज्यात आज कायद्याचं राज्य आहे. माफिया राज आणि दहशतवाद नियंत्रणात आला आहे. महिलांकडे वाकड्या नजरेनं पाहणारे कायद्याच्या नजरेतून सुटू शकत नाहीत.

योगी स्वत: हार्ड वर्क करतात. ते नेहमी प्रत्येक ठिकाणी भेट देतात आणि विकासकामांचा आढावा घेतात. त्यांच्या कामात तत्परता दिसून येते आणि वाराणसीतील नागरिकांनी ती पाहिली असल्याचंही मोदी म्हणाले. फक्त वाराणसीच नाही तर संपूर्ण राज्यात त्यांच्या कामाची पद्धत अशीच असल्याचंही मोदींनी म्हटलं.

loading image