esakal | कोरोनाने जगाला खूप काही शिकवलं, भारत ताकदीनिशी संकटाशी लढला - PM मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Pm Modi

देशातील आरोग्य क्षेत्रात अनेक कमतरता आहेत. त्या दूर करण्यासाठी गेल्या सहा सात वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचंही मोदी म्हणाले.

भारत ताकदीनिशी कोरोनाच्या संकटाशी लढला - PM मोदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजीचे उद्घाटन केले. यासह त्यांनी राजस्थानमधील ४ मेडिकल कॉलेजची पायाभरणीसुद्धा केली. या कार्यक्रमावेळी बोलताना मोदी म्हणाले की, भारताने कोरोनाच्या संकटात आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानात ४ मेडिकल कॉलेजची उभारणी आणि इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजीचे उद्घाटन हे या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे.

कोरोनाने जगाला खूप काही शिकवलं आहे. विशेषत: आरोग्य क्षेत्रातील अनेक गोष्टींबाबत शिकायला मिळालं आहे. प्रत्येक देशाने आपआपल्या पद्धतीने या संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानेसुद्धा आपल्या ताकदीनुसार या संकटाशी झुंज दिल्याचं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ नंतर राजस्थानात २३ नवीन मेडिकल कॉलेजला केंद्र सरकारने परवानगी दिली होती. यातील ७ मेडिकल कॉलेज सुरु झाली आहेत. मला आशा आहे की, नव्या मेडिकल कॉलेजची उभारणी राज्य सरकारच्या सहकार्याने लवकर होईल. देशातील आरोग्य क्षेत्रात अनेक कमतरता आहेत. त्या दूर करण्यासाठी गेल्या सहा सात वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचंही मोदी म्हणाले.

हेही वाचा: छत्तीसगढमध्येही काँग्रेसचं सरकार डळमळीत, 15 आमदार दिल्लीत

गेल्या सहा सात वर्षांमध्ये १७० नवीन मेडिकल कॉलेज तयार झाली आहेत. १०० पेक्षा जास्त मेडिकल कॉलेजचं काम सुरु आहे. २०१४ मध्ये देशात मेडिकलच्या अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेमध्ये जागांची संख्या ही ८२ हजार होती. ती आज वाढून १ लाख ४० हजार जागांपर्यंत पोहोचली असल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यात काही विकासकामे करावीत अशी विनंतीसुद्धा केली. तसंच मोदी म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेवलात त्याबद्दल आभारी आहे. लोकशाहीची हीच एक ताकद आहे की आपण वेगवेगळ्या पक्षाचे आणि विचारधारेचे असूनही एकत्र काम करतो.

loading image
go to top