
पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील केवडीयातील सरदार सरोवर ते अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत उड्डाण करुन या सेवेचे उद्घाटन केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये देशातील पहिल्या सी प्लेन सर्व्हीसचे उद्घाटन केले. त्यांनी गुजरातमधील केवडीयातील सरदार सरोवर ते अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत उड्डाण करुन या सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा सुरु झाल्यानंतर गुजरातमध्ये पर्यटनाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी केवडीयामधून सी प्लेनच्या पहिल्या फ्लाईटमध्ये प्रवास करत साबरमती रिव्हर फ्रंटला गेले.
हेही वाचा - पुलवामा हल्ल्याचं विरोधकांनी घाणेरडं राजकारणं केलं; PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख
ही सी प्लेन सेवा अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटला केवडीयामधील स्टॅच्यू ऑफ यूनिटीला जोडते. सी प्लेनमधून केवडीया ते साबरमती या दरम्यानचे दोनशे किलोमीटरचे अंतर फक्त 45 मिनिटांत पूर्ण होते. स्पाइसजेट या कंपनीद्वारे ही सेवा दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्तच्या भाषणात म्हटलं होतं की, आज सरदार सरोवर ते साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत सी-प्लेन सेवेचा शुभारंभ होणार आहे. सरदार पटेलांच्या दर्शनासाठी म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी आता देशवासीयांना सी प्लेन सर्व्हीसचाही पर्याय उपलब्ध आहे. या साऱ्या प्रयत्नामुळे या भागात पर्यटनाला खूपच जास्त चालना मिळणार आहे.
हेही वाचा - कशासाठी मागायची माफी? शशी थरुरांचा 'पुलवामा'वरुन भाजपला संतप्त सवाल
PM Shri @narendramodi inaugurates water aerodrome and sea plane service in Kevadia, Gujarat. https://t.co/hss2STi3Zk
— BJP (@BJP4India) October 31, 2020
ही सेवा अहमदाबाद ते केवडीया मार्गासाठी असेल. यासाठी 1500 रुपयांपासून तिकीट भाडे असेल. सी प्लेन साठी तिकीटाचे बुकींग www.spiceshuttle.com या वेबसाईटवरुन केली जाऊ शकते. या सेवेसाठी तिकीट 1500 रुपयांपासून सुरु होत असून 30 ऑक्टोबर नंतर स्पाइस शटलच्या वेबसाईटवरुन बुकींग केलं जाऊ शकतं. ही सी प्लेन सेवा स्पाइसजेटची सहयोगी कंपनी स्पाइस शटलद्वारे देण्यात येईल. स्पाइसजेट दररोज दोन सी प्लेन ची वाहतुक करेल. प्रत्येक फ्लाईटचे अवधी साधारण तीस मिनिट असेल.