अपयशी ठरलो तर याचा अर्थ आपण यशाच्या दिशेने आहोत - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

एका अपयशाने आपण नाराज होता कामा नये. प्रत्येक प्रयत्नात आपण उत्साह भरू शकतो. तसेच कोणत्या गोष्टीत आपण अपयशी झालो तर त्याचा अर्थ आपण यशाच्या दिशेने निघालो आहोत. त्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला कोणीही यातून बाहेर काढू शकत नसल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात संवाद साधत आहेत.

नवी दिल्ली : एका अपयशाने आपण नाराज होता कामा नये. प्रत्येक प्रयत्नात आपण उत्साह भरू शकतो. तसेच कोणत्या गोष्टीत आपण अपयशी झालो तर त्याचा अर्थ आपण यशाच्या दिशेने निघालो आहोत. त्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला कोणीही यातून बाहेर काढू शकत नसल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात संवाद साधत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं रहावं याबाबत ते विद्यार्थ्यांना कानमंत्र देत आहेत. सलग तिसऱ्या वर्षी मोदी विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे संवाद साधत आहेत. विविध शाळांमध्ये परीक्षा-पे-चर्चाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून ते सर्वांशी थेट संवाद साधत आहेत. आपले मन स्थिर नसते त्याच वेळेस घरात अभ्यास करण्यास सांगण्यात येते त्यावेळेस आपला मूड ऑफ होतो. त्यासाठी मन एकाग्र करणे गरजेचे असल्याचेही मोदी म्हणाले. याला बाहेरची परिस्थितीही जास्त जबाबदार असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जवानाच्या लग्नाची जय्यत तयारी चालू होती, पण तो पोहोचू शकला नाही; कारण...

ही वर्षांपूर्वी झालेल्या एका क्रिकेट सामन्यातील उदाहरण देताना मोदी म्हणले, 'राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी ज्या पद्धतीने खेळाची बाजी पलटली इतकेच नव्हे तर त्यांनी सामना जिंकला होता. सुरुवातीला संपूर्ण वातावरण नकारात्मक होतं. मात्र, त्यांचा सकारात्मकतेने हे शक्य केलं. एकदा भारताचा संघ वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर गेला त्यावेळी अनिल कुंबळे गोलंदाजी करु शकेल की नाही असे वाटत होते. मात्र, त्यावेळी कुंबळेने ब्रायन लाराची विकेट घेत संपूर्ण सामना बदलवला, अशा प्रकारे आपण स्वतःलाच प्रेरणा देऊ शकतो. स्वतः आपण प्रेरणा घेऊन नवीन काहीतरी करण्याचा कायम प्रयत्न करू शकतो, असेही ते म्हणाले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi interacts with students during ‘Pariksha Pe Charcha 2020