Narendra Modi In France : केवळ भारतानेच एकमेव नेता बनावे, अशी आमची भूमिका नाही; पंतप्रधान मोदींची ग्वाही

सर्व क्षेत्रांत सहकार्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही; ‘ले इको’ या फ्रेंच दैनिकाशी दिलखुलास संवाद
Indo-Pacific
Indo-Pacificsakal
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक फ्रान्स दौऱ्याला सुरूवात झाली. ते येथील ऐतिहासिक ‘बॅस्टिल डे’ संचलनास उपस्थित राहणार

मागील काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धींगत झाले आहेत. हे सगळे आताच का होते आहे?

मागील नऊ वर्षांमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील संबंध एका नव्या पातळीवर पोचले आहेत. या मैत्रीला सरकार, संसद, उद्योग, शिक्षणक्षेत्रांतून मोठा पाठिंबा मिळतो आहे. अमेरिकी काँग्रेसचा देखील त्याला पाठिंबा आहे.

ताज्या अमेरिका दौऱ्यामध्ये याच मैत्रीपर्वाचे प्रत्यंतर आले. समान हित, दृष्टिकोन, परस्परांना मदत करण्याची कटिबद्धता आणि प्रोत्साहन याआधारावर ही भागीदारी अधिक भक्कम झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक फ्रान्स दौऱ्याला सुरूवात झाली. ते येथील ऐतिहासिक ‘बॅस्टिल डे’ संचलनास उपस्थित राहणार असून त्यांच्या या दौऱ्यामध्ये अनेक मोठ्या संरक्षणविषयक करारांची घोषणा होणार आहे.

एरव्ही परकी माध्यमांशी सावधगिरीने बोलणाऱ्या पंतप्रधानांनी ‘ले इको’ या फ्रेंच दैनिकाशी मात्र मोकळेपणाने संवाद साधला. दक्षिणेच्या (ग्लोबल साउथ) सामूहिक नेतृत्वाचा पुरस्कार करतानाच त्यांनी फ्रान्ससोबतच्या भागीदारीला उजाळा दिला.

Indo-Pacific
PM Modi France Visit : राफेल-एम विमाने, स्कॉर्पीन पाणबुड्या; पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यामध्ये मोठ्या करारांची शक्यता

प्रश्न ः फ्रान्सशी तुम्ही नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये भागीदारी करत आहात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ः साधारणपणे २०१४ पासूनचा काळ लक्षात घेतला तर भारत आणि फ्रान्स यांच्यातील व्यापार जवळपास दुप्पट झाला आहे. भारतातील दोन विमान कंपन्यांनी ‘एअरबस’कडून साडेसातशे विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे.

जनतेच्या कल्याणासाठी डिजिटल पायाभूत सेवांचा वापर करण्याबाबत दोन्ही देश आग्रही आहेत. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजनच्या निर्मितीमध्येही आमची भक्कम आघाडी आहे. हे सहकार्य अधिक वृद्धींगत करण्यासाठी मॅक्रॉन यांच्या सरकारने पुढाकार घेतला आहे.

मागील वर्षी पॅरिस बुक फेअर, कान्स चित्रपट महोत्सव, विवा टेक, पॅरिस इन्फ्रा विक आणि इंटरनॅशनल सीटेक विकमध्ये भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. औद्योगिक आघाडीवर देखील आम्ही एकत्र काम करत आहोत. आम्हीच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. अध्यक्ष मॅक्रॉन जो काही विचार करतात तो आमच्याशी बऱ्याच अंशी सुसंगत आहे.

‘हिंद- प्रशांत’मध्ये फ्रान्स हा भारताचा महत्त्वाचा शेजारी आहे? भारत - फ्रान्समध्ये नेमके कोणत्या प्रकारचे सहकार्य तुम्हाला अपेक्षित आहे?

‘हिंद-प्रशांत’ क्षेत्रात मुक्त, खुले, सर्वसमावेशक आणि सुरक्षित वातावरण असावे यावर आमचा भर आहे. यासाठी समुद्रापासून अंतराळापर्यंतच्या भागीदारीवर आमचा भर आहे. हे सुरक्षेचे कवच अधिक भक्कम करण्यासाठी आमचा प्रादेशिक सहकार्यावर भर आहे.

परस्परांच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत यामुळेच शांतता आणि समृद्धी नांदेल. या भागीदारीमुळे प्रादेशिक सहकार्याची दारे खुली होतील. आमच्या या भागीदारीमध्ये युरोपीय महासंघाचा देखील समावेश असून या संघटनेची स्वतःची अशी हिंद प्रशांतविषयक रणनीती आहे.

Indo-Pacific
PM Modi France Visit: संरक्षण दलाची ताकद वाढणार! 3 स्कॉर्पिअन पाणबुड्या, 22 राफेल अन् 4 ट्रेनर विमानं मिळणार

भारत आणि फ्रान्स यांच्यातील रणनितीक भागीदारीला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसे पाहता?

भारत- फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध आता निर्णायक वळणावर आले आहेत. कोरोना महामारीनंतरचा काळ विचारात घेतला तर हे संबंध अधिक घट्ट झाल्याचे दिसून येतात. आता आम्ही पुढील २५ वर्षांमध्ये नेमकी कशी वाटचाल करायची?

याचा देखील आढावा घेत आहोत. दोन्ही देशांचा परस्परांवर विश्वास आहे. अवकाश ते अंतराळ या क्षेत्रातील आमच्या भागीदारीला पाच दशकांचा इतिहास आहे. जेव्हा पश्चिमेने आमच्याकडे पाठ फिरवली होती तेव्हा फ्रान्सने मदतीचा हात पुढे केला होता.

मी २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर हे संबंध अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला. एप्रिल-२०१५ मध्ये या देशाला भेट देण्याचा योग आला. फ्रान्समध्ये मॅक्रॉन हे सत्तेत आल्यानंतर आमची भागीदारी आणखीनच घट्ट झाली आहे.

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून तुम्ही याकडे नेमके कसे पाहता?

भारताच्या अतिप्राचीन संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास असून सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. तरुणाई ही भारताची मोठी संपत्ती आहे. अनेक देशांच्या लोकसंख्येचे आयुर्मान घटू लागले असून काहींच्या बाबतीत संख्यात्मक घसरण देखील मोठी आहे.

येत्या काही दशकांमध्ये भारताची युवा आणि कौशल्यप्राप्त लोकसंख्या ही जगासाठी मोठी संपत्ती ठरेल. भारताची ही युवा श्रमशक्ती मोकळेपणा आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारी असून नवे तंत्रज्ञान शिकण्याची त्यांची तयारी असून बदलत्या जगाचा स्वीकार करायलाही ते तयार आहेत. आज भारतीय लोक जगामध्ये ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या देशाच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.

Indo-Pacific
PM Modi France Visit: फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! PM मोदींनी केली 'ही' मोठी घोषणा

भारत आज कशामुळे सॉफ्ट पॉवर बनला आहे? याबाबत तुमचे काय मत आहे?

सांस्कृतिक मूल्ये आणि ऐतिहासिक वारशामुळे भारत सॉफ्ट पॉवर बनला आहे. याबाबतीत एक मोठा आशीर्वाद आम्हाला मिळाला असून भारताने कधीच इतरांवर युद्ध आणि वर्चस्ववाद लादण्याचा प्रयत्न केला नाही.

आम्ही जगाला योग, आयुर्वेद, अध्यात्म, विज्ञान, गणित आणि खगोलशास्त्र दिले. भारताने नेहमीच वैश्विक शांतता आणि प्रगतीमध्ये योगदान दिले आहे. आम्हाला भूतकाळापासून प्रेरणा घेऊनच पुढे वाटचाल करावी लागेल. हे शक्य झाले तरच आम्हाला प्रगती करता येईल.

निसर्गासोबतच्या सह अस्तित्वामुळेच आम्ही जागतिक तापमानवाढीसारख्या समस्येशी दोन हात करू शकतो. शांतता, खुलेपणा, सौहार्द आणि सहअस्तित्व हीच मूल्ये आमच्या लोकशाहीच्या यशाचा आधार आहेत. आंतरराष्ट्रीय कायदे आणि शांततेप्रती आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळेच जगभरात आमचे स्वागत होते. आमच्या प्रगतीची कुणालाही भीती वाटत नाही.

Indo-Pacific
India Poverty : गरीबी कमी करण्यात भारताला यश; ‘यूएनडीपी’चा अहवाल

दक्षिणेचे नैसर्गिक नेतृत्व म्हणून तुम्ही भारताकडे पाहता काय?

भारताने स्वतःहून असा दावा करण्याचे कारण नाही. दक्षिणेसाठी सामूहिक नेतृत्व गरजेचे आहे, असे मला वाटते. तसे झाले तरच आमच्या आवाजाला अधिक धार येऊ शकेल. सगळ्या समुदायानेच स्वतःचे नेतृत्व करावे.

केवळ भारतानेच एकमेव नेता बनावे, अशी आमची भूमिका नाही, तसा विचार देखील आम्ही करत नाहीत. आतापर्यंत दक्षिणेला हक्क नाकारण्यात आला आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.

जागतिक पातळीवर जेव्हा निर्णयाची वेळ येते तेव्हा मात्र या देशांना स्वतःचे स्थान दिसून येत नाही. दक्षिणेला मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांना भारतासारख्या मजबूत खांद्याची आवश्यकता आहे. भारत उत्तरेशी देखील संधान साधू शकतो. त्यामुळे सगळ्यांनीच आमचे खांदे मजबूत करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com