

PM Modi important appeal to citizens
देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आलंय. तर बहुतांश राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४५च्या वर आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी पाणी जास्त पिण्याचं आवाहन केलंय. तसंच पशु पक्ष्यांसाठीही पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितलंय. शक्य झालं तर तहानलेल्या व्यक्तीला एक ग्लास पाणी अवश्य द्या असंही मोदींनी म्हटलं.