COVID-19 Vaccination Drive: PM मोदी करणार शुभारंभ; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही!

टीम ई-सकाळ
Thursday, 14 January 2021

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याबाबत माहिती दिली होती.

नवी दिल्ली : जगभरासह देशातही धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना लसीची वाट प्रत्येकजण पाहत होता. ती प्रतीक्षा पूर्णही झाली आहे. बुधवारी (ता.१३) देशभरातील विविध राज्यांमध्ये कोरोना लसीचे वितरण करण्यात आले. 

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जानेवारीला सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोव्हिड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे. 

अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​

देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्र प्रदेशातील एकूण ३००६ लसीकरण केंद्रे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यावेळी जोडली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना यावेळी लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर सुमारे १०० लाभार्थ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. 

यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!​

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याबाबत माहिती दिली होती. यावेळी त्यांनी लसीकरणाचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. लसीकरण शुभारंभाप्रसंगी पंतप्रधान आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

त्याच दिवशी पंतप्रधान मोदी को-विन (Covid Vaccine Intelligence Network) अॅपदेखील लाँच करणार आहेत. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi to Launch COVID Vaccination Drive on 16 January