esakal | आत्मनिर्भर भारतामागे भगवद्गीतेची प्रेरणा; PM मोदींनी लाँच केलं गीतेचं किंडल व्हर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi.

या लाँचिंगच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की, भगवद्गीता आपल्याला विचार करण्यासाठी प्रेरणा देते. 

आत्मनिर्भर भारतामागे भगवद्गीतेची प्रेरणा; PM मोदींनी लाँच केलं गीतेचं किंडल व्हर्जन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी स्वामी चिद्भवानंद यांच्या भगवद्गीतेचं किंडल व्हर्जन लाँच केलं आहे. या लाँचिंगच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की, भगवद्गीता आपल्याला विचार करण्यासाठी प्रेरणा देते. गीता आपल्याला काहीतरी नवं करण्याची प्रेरणा देते. 

पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमादरम्यान म्हटलंय की, आपल्याला विषादपासून विजयापर्यंत घेऊन जाणाऱ्या विचारांची भगवद्गीता संयुक्त रुप आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, महात्मा गांधी असोत वा लोकमान्य टिळक प्रत्येक जण या भगवद्गीतेमुळे प्रभावित झाला आहे. आपल्या भाषणात मोदींनी म्हटलं की गीता आपल्याला ताकद देते. 

एका आर्टिकलमध्ये भगवद्गीतेशी कोरोना काळाशी जोडून पाहिलं गेलं. यामध्ये डॉक्टरांना अर्जून म्हटलं गेलं तर हॉस्पिटलना युद्धस्थळाची उपमा दिली गेली. मी देशातील युवकांना अपील करतो त्यांनी गीता वाचावी. गीता आपल्याला आयुष्यातील अडचणींशी दोन हात करण्यामध्ये सातत्याने मदत करेल, असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा - ममतांच्या पायाला प्लास्टर; 2 मे ला जनतेची दिसेल ताकद, भाजपला 'तृणमूल'चा इशारा

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं की, जेंव्हा जगाला औषधाची गरज होती, तेंव्हा भारताने शक्य ते सगळं केलं जे करता येणार होतं. भारताला या गोष्टीचा अभिमान असायला हवा की, स्वदेशी लस जगभरात पाठवली जात आहे. हेच आपल्याला गीता शिकवते. आत्मनिर्भर भारत जगासाठी उपयुक्त आहे, असं मला वाटतं. याशिवाय पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, स्वामी विवेकानंदांचे उपदेश देखील लोकांना याचप्रमाणे प्रभावित करायचे. तमिळनाडूतील रामकृष्ण तपोवनम् आश्रमाचे फाऊंडर स्वामी चिद्भवानंदांच्या भक्तांची संख्या देखील खूपच जास्त आहे. त्यांची 186 हून अधिक पुस्तके वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये छापली गेली आहेत.