esakal | PM मोदींनी केले लाईट हाऊस प्रोजेक्टचे उद्घाटन; स्थानिक पर्यावरणानुसार बांधणार भुंकपविरोधी घरे
sakal

बोलून बातमी शोधा

LHP Modi

या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे की घरबांधणीसाठी जगभरातील अभिनव तंत्रज्ञान अवलंबणे आणि ते मुख्य प्रवाहात आणणे.

PM मोदींनी केले लाईट हाऊस प्रोजेक्टचे उद्घाटन; स्थानिक पर्यावरणानुसार बांधणार भुंकपविरोधी घरे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी लाईट हाऊस प्रोजेक्टचे (LHP) व्हर्च्यूअली उद्घाटन केले. या प्रोजक्टची कल्पना केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने मांडली आहे. या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे की घरबांधणीसाठी जगभरातील अभिनव तंत्रज्ञान अवलंबणे आणि ते मुख्य प्रवाहात आणणे. असे तंत्रज्ञान जे टिकाऊ आणि आपत्तीशी लढा देणारे असेल. मंत्रालयाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत लोकांना स्थानिक पर्यावरण तसेच वातावरण लक्षात घेऊन टिकाऊ आणि मजबूत असे घर बांधून दिले जातात. ग्लोबल हाऊसिंग टेक्नोलॉजी चॅलेंज- इंडियाच्या (GHTC) अंतर्गत हा लाईट हाऊस प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे.

यावेळी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. 

हे प्रोजेक्ट्स इंदोर, राजकोट, चेन्नई, रांची, अगर्ताला आणि लखनऊमध्ये उभारण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर सुविधेसह भुकंपविरोधी अशी 1,000 घरे बांधण्यात येणार आहेत. 

loading image