PM Modi to Visit Manipur for 3 Hours
esakal
देश
PM Modi Manipur Visit : पंतप्रधान मोदी तीन तासांसाठी मणिपूरला जाणार; हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा; काँग्रेसची टीका
First Tour After 29 Months of Violence : हा दौरा केवळ 3 तासांचा असल्याने हा मणिपूरच्या जनतेचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. तर मोदींचा हा दौरा म्हणाले केवळ ‘पर्यटन’ आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मणिपूरला भेट देणार आहेत. 29 महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. मात्र, या दौऱ्यावरून काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. हा दौरा केवळ 3 तासांचा असल्याने हा मणिपूरच्या जनतेचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. तर मोदींचा हा दौरा म्हणाले केवळ ‘पर्यटन’ आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
