Cabinet Reshuffle : कोणत्या मंत्र्यांचे पद जाणार, कोणाला मिळणार संधी? मोदींनी अचानक बोलावली बैठक! मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार?

PM Modi to Hold Meeting with All Union Ministers : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेणार असून, सुशासन, सरकारी योजनांचा आढावा आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
Prime Minister Narendra Modi is scheduled to meet all Union Ministers to discuss governance, administrative reforms, welfare schemes and the possibility of a cabinet expansion

Prime Minister Narendra Modi is scheduled to meet all Union Ministers to discuss governance, administrative reforms, welfare schemes and the possibility of a cabinet expansion

Esakal

Updated on: 

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (१८ नोव्हेंबर) मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांची बैठक बोलावली आहे. वार्षिक भारत-आसियान शिखर परिषदेतून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी सकाळी सर्व केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत सुशासन, प्रशासकीय सुधारणा, कल्याणकारी योजना आणि विकासाच्या उपक्रमांमध्ये महिला व तरुणांचा सहभाग वाढवण्यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमुळे या बैठकीकडेही लक्ष लागले आहे. मात्र, मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Loading content, please wait...