PM Modi Viral Video
esakal
बिहार : मुझफ्फरपूर येथे झालेल्या निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी मुझफ्फरपूर येथे प्रचार सभेसाठी पोहोचले असता, त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोकांचा जनसमुदाय जमला होता. हेलिकॉप्टरमधून उतरताच 'मोदी, मोदी' अशा घोषणा सुरू झाल्या आणि मोदींनीही त्यांच्या समर्थकांना खास अंदाजात प्रतिसाद दिला.