पंतप्रधान मोदींनी घेतले पर्रिकरांचे अंत्यदर्शन

वृत्तसंस्था
सोमवार, 18 मार्च 2019

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याचे पार्थिव त्यांच्या ताळ्गाव येथील निवासस्थानाहून पणजीतील भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर आण्यात आले. त्यानंतर कला अकादमी आवारात अंत्यदर्शनासाठी  त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी झाली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मनोहर पर्रीकर यांना वाहिली श्रद्धांजली. त्यावेळी इराणी झाल्या भावूक झाल्या. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी देखील पर्रिकरांचे अंत्यदर्शन घेतले. मोदींकडूनही पर्रिकरांचे दोन्ही मुलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले

सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून पर्रीकर यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना "व्हेंटिलेटरवर' ठेवण्यात आले होते. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती आणखी खालावली. गोमेकॉ इस्पितळाच्या डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचारांची शर्थ केली; परंतु त्यात यश आले नाही. पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच ताळगाव येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी सरकारमधील मंत्री, आमदार, भाजप नेते, तसेच मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांनी धाव घेतली. पर्रीकर यांच्यामागे दोन चिरंजीव आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 
 
Web Title: PM Modi pays tribute to Manohar Parrikar