esakal | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची अमेरिकेच्या अध्यक्षांशी फोनवरुन चर्चा

बोलून बातमी शोधा

Modi_Biden
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची अमेरिकेच्या अध्यक्षांशी फोनवरुन चर्चा
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाच्या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यामध्ये सोमवारी रात्री फोनवरुन चर्चा झाली. भारताला जगभरातून मदत मिळावी यासाठी पंतप्रधानांसह प्रशासकीय स्तरावरुन इतर देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला जात आहे. या परिणाम म्हणून अनेक देशांनी भारतासाठी मदत रवाना केली आहे.

जो बायडन यांच्याशी चर्चेनंतर मोदींनी ट्विट करुन सांगितलं की, "बायडन यांच्याशी माझी मैत्रीपूर्ण चर्चा झाली. दोन्ही देशांमधील कोविडच्या स्थितीवर आमची सविस्तर चर्चा झाली. यावेळी अमेरिकेने भारताला पाठवलेल्या मदतीबद्दल मी अध्यक्ष बायडन यांचे आभार मानले. अमेरिकेकडून भारताला पुरवण्यात येणाऱ्या लसीच्या कच्च्या मालाबाबत आणि औषधांबाबत आमच्यामध्ये महत्वाची चर्चा झाली. भारत-अमेरिका हेल्थकेअर पार्टनरशीप कोरोनाचं जागतिक आव्हान सोडवू शकते," असंही मोदींनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या लाटेमध्येही भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत - RBI

अमेरिकेनं रविवारी भारताला कच्चा माल पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाच्या २४ तासातंच अमेरिकेने ऑक्सिजन प्लान्ट आणि इतर वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप भारताकडे रवाना केली होती ही खेप सोमवारी भारतात पोहोचली.

हेही वाचा: "लसींच्या किंमती कमी करा"; केंद्राचं 'सीरम' आणि 'भारत बायोटेक'ला आवाहन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरिस, संरक्षण सचिव लॉयड आस्टिन, परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यासह इतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतावर घोंघावत असलेल्या कोरोना संकटावर चिंता व्यक्त केली होती. तसेच भारताला लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं होतं.