
Viral moment PM Modi replies to farmers witty potato gold remark
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या एका विशेष कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. मोठ्या संख्येनं महिलांनीसुद्धा या कार्यक्रमात भाग घेतला होता. शेतीशी संबंधित प्रयोग आणि अनुभव शेतकऱ्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना सांगितले. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसोबत कृषी उत्पादने, नवं तंत्रज्ञान आणि पीकाच्या विविधतेचं महत्त्व यावर चर्चा केली.