
PM मोदींची महत्वाची बैठक, उष्णतेची लाट-मान्सूनबद्दल घेणार आढावा
नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. तसेच मान्सून देखील काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi Meeting) अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे. नुकतेच युरोप दौऱ्यावरून परतलेले मोदी दिवसभरात सात ते आठ सभा घेणार आहेत. याबाबत पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
हेही वाचा: '2014 पूर्वी पदक तालिकेत भारत कुठेच नसायचा पंतप्रधान मोदी आले अन्.. '
एप्रिलमध्ये देशातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४६-४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली होती. राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातील विदर्भ या पाच भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दिल्लीत 1951 नंतर या वर्षीचा दुसरा सर्वात उष्ण एप्रिल महिन्याची नोंद झाली. या काळात 40.2 अंश सेल्सिअस मासिक सरासरी कमाल तापमान नोंदवण्यात आले. 1941 मध्ये दिल्लीत एप्रिल महिन्याचे उच्च कमाल तापमान 45.6 अंश सेल्सिअस होते.
महाराष्ट्रातील विदर्भात तापमानाचा पारा ४६ अंशाच्या पार पोहोचला होता. अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले होते. पण, दोन दिवसांपूर्वी रिमझिम पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला. तसेच दिल्लीत देखील एक दिवसापूर्वी काही भागात गारपीटीसह पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
यापूर्वी व्यक्त केली होती चिंता -
गेल्या आठवड्यात, मोदींनी वाढत्या तापमानाबद्दल आणि लँडफिल्स, कचऱ्याचे ढिगारे आणि जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांबद्दल तीव्र इशारा दिला होता. देशातील तापमान झपाट्याने वाढत असून विविध ठिकाणी आगीच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मुख्यमंत्र्यांशी बोलताना मोदींनी राज्यांना रुग्णालये, कारखाने आणि सार्वजनिक महत्त्वाच्या इतर इमारतींच्या अग्निसुरक्षा ऑडिटला प्राधान्य देण्यास सांगितले होते. आता मोदी राज्यातील उष्णतेची लाट आणि मान्सूनच्या तयारीची आढावा बैठक घेणार आहेत.
Web Title: Pm Modi Review Meeting Heatwave Monsoon Says Government Sources
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..