'2014 पूर्वी पदक तालिकेत भारत कुठेच नसायचा पंतप्रधान मोदी आले अन्.. ' | Amit Shah Says Before 2014 India was No Where in Medal tally | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah Says Before 2014 India was No Where in Sports

'2014 पूर्वी पदक तालिकेत भारत कुठेच नसायचा पंतप्रधान मोदी आले अन्.. '

बंगळुरू : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर हे आज (दि. 03) बंगळुरूमध्ये खेलो इंडियाच्या (Khelo India) सांगता समारंभासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी एक मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की '2014 पूर्वी भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पदक तालिकेत कोठेही नसायचा. 2014 पूर्वी सगळे क्रीडा प्रेमी क्रिकेट सोडून इतर आंतरराष्ट्रीय सामने पाहताना चिंतेत असायचे मग ते ऑलिम्पिक (Olympics), आशियाई स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या वैयक्तिक गेममध्ये भारत पदक तालिकेत कुठेच दिसायचा नाही.'

हेही वाचा: 'तुम्ही असे का बोलता सर...' रमजानबद्दलच्या इरफानच्या ट्विटवर कमेंटचा पाऊस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमात पुढे म्हणाले की, 'आपली हॉकीत (Hockey) देखील पिछेहाट झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेत आले आणि त्यांनी भारताला सर्व क्षेत्रात अव्वल बनवण्याचे एक लक्ष्य ठेवले. यात खेळाचाही समावेश होता. त्यांनी फिट इंडिया (Fit India), खेलो इंडिया (Khelo India), खेळाचे विद्यापीठ (University Of Sports) असे अनेक उपक्रम सुरू केले. याच उपक्रमांचा फायदा आपण पाहतो आहे.'

हेही वाचा: महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा पुण्यात खेळवण्यात येणार : जय शहा

या कार्यक्रमादरम्यान, अमित शहा यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या भारतीय महिला हॉकी संघ, पुरूष हॉकी संघाचे अभिनंदन केले. भारताने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 7 पदके जिंकली आहे. यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. या वेळी 124 जणांचा भारतीय समूह ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. असे असले तरी 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 83 जणांच्या समुहाने 6 ऑलिम्पिक पदके जिंकली होती. यात दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश होता.

Web Title: Amit Shah Says Before 2014 India Was No Where In Sports Medal Tally

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top