
रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज रविवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. PM मोदींची याआधीची बैठक 24 डिसेंबर रोजी झाली होती. मात्र तेव्हापासून, देशातील कोरोना परिस्थिती बदलली आहे आणि दैनंदिन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येतील ही वाढ दिवसेंदिवस होतच आहे. अनेक शहरांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव वाढला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमधील (Uttar Pradesh, Punjab, Uttarakhand, Goa, Manipur) निवडणूक वेळापत्रकाची घोषणा या पार्श्वभूमीवर ही चिंता आणखी वाढली आहे. सध्या 15 ते 18 वयोगटातील किशोरांचंही कोरोना लसीकरण केलं जात आहे, तर 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स ज्येष्ठ नागरिकांसाठी खबरदारीचे डोस उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा: मविआ सरकारनं लादलेल्या कोरोना निर्बंधाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री अनभिज्ञ?
भारतातील कोरोनाची संख्या गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढत आहे. रविवारी भारतात 1.59 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ऍक्टीव्ह केसलोड सुमारे 6 लाखांवर पोहोचला आहे. अनेक राज्यांनी ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शनिवार व रविवारी कर्फ्यू, रात्रीचा कर्फ्यू आणि इतर निर्बंध लादले आहेत.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर येथे १० फेब्रुवारीपासून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने या पाच राज्यांच्या निवडणुका पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जाहीर केला आहे. या निवडणुका सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून घेतल्या जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे. ओमिक्रॉनची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच या मतदानाच्या राज्यांमध्ये 15 जानेवारीपर्यंत प्रत्यक्षातील प्रचाररॅलींवर बंदी घातली आहे. आयोगाच्या पुनरावलोकनानंतर ही बंदी उठू शकते, परंतु EC चा प्रचार कर्फ्यू रात्री 8 नंतर कायम राहणार आहे.
हेही वाचा: खरंच डेल्टाक्रॉन अस्तित्वात आहे? नव्या स्ट्रेनबद्दल संशोधक काय म्हणतात?
संशोधकांच्या मते, भारतात महामारीचा तिसरा टप्पा सुरु आहे. हा तिसरा टप्पा पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा वेगळा आहे कारण सध्या नागरिकांचे लसीकरणाचे व्यापक प्रमाणावर झालेले असून निर्बंधही कमी आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती झपाट्याने बदलत असून या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट शिखरावर पोहोचू शकतो, असे तज्ञांनी सांगितलंय.
Web Title: Pm Modi Reviews Covid 19 Situation Amid Surge Of Infections
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..