नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) खुलेपणाने कौतुक केले. मोदींनी संघाला राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं म्हटलं. परंतु, त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार बी. के. हरिप्रसाद यांनी जोरदार टीका केली. हरिप्रसाद यांनी मोदींच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरएसएसला थेट ‘भारतीय तालिबान’ असे संबोधले. त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली.