भाजप निवडणूक नव्हे तर ह्रदय जिंकणारा पक्ष - मोदी

भाजप निवडणूक नव्हे तर ह्रदय जिंकणारा पक्ष - मोदी

BJP Foundation Day 2021: नवी दिल्ली - भाजप निवडणूक जिंकण्याचं मशीन नाही, तर देशातील नागरिकांची ह्रदय जिंकण्याचं अभियान आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते दिल्लीमध्ये भाजपच्या ४१ व्या स्थपना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कामाचा आणि प्रवासाचा लेखाजोखा मांडला. तसेच विरोधकांवर टीकास्त्रही डागलं. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, सुधारित नागरिकत्व कायद्यावरही भूमिका मांडली. अन् निवडणुकांमधील विजयावरून भाजपावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिलं.

“ लोकांना दिल्या जाणार लाभावरून आमच्या सरकारचं मूल्याकंन  केलं जातेय. सरकारच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्याचा हा एकप्रकारचा मूलमंत्रच झालाय. असे असतानाही भाजपनं निवडणूक जिंकली तर मशीन म्हटलं जातं. अन् इतर पक्षानं निवडणूक जिंकली तर कौतूक केलं जातं. असं का? पण असं म्हणणाऱ्या लोकांना लोकशाहीची परिपक्वता कळालेली नाही. या लोकांना भारतीयांच्या आशा अपेक्षाही समजत नाहीये. भाजपा सत्तेत असो वा विरोधी बाकांवर जनतेशी नाळ कायम ठेवलेली आहेच. भाजप निवडणूक जिंकणारा नव्हे तर ह्रदय जिंकणारा पक्ष आहे. आणि भाजपला ही  ताकद कार्यकर्तेच देतात. ते लोकांमध्ये राहून काम करतात अन् पक्षाची ताकद वाढवतात. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच भाजप आज जगातील सर्वात मोठा पक्ष बनलाय” असं मोदी म्हणाले.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर महत्वाच्या नेत्यांनी भाजप पक्षाच्या स्थपाना दिवसाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत भाजपच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेय की, "आपल्या परिश्रमातून भाजपला एका विशाल वटवृक्षात रुपांतर करणाऱ्या सर्व महापुरुषांना प्रणाम. राष्ट्रवादी विचारधारा, अंत्योदय सिद्धांत आणि मोदीजींच्या नेतृत्वात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजप नेहमी प्रयत्नशील राहिल."

भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झाली होती. भारतीय जनसंघ व जनता पक्ष यांना अनुसरून पुढे भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. हिंदुत्त्व, सामाजिकता, समान नागरिकत्व, समानता ही भाजपची काही महत्त्वाची तत्त्वे आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी भाजपचे पहिले अध्यक्ष होते. भाजपची धोरणे ही उजव्या विचारधारेप्रमाणे चालणारी आहेत. अटलबिहारी वाजपेयींनंतर, लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जन कृष्णमुर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शाह व सध्या जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com