बेपत्ता जवानाच्या पत्नीची PM मोदींकडे मागणी

बेपत्ता जवानाच्या पत्नीची PM मोदींकडे मागणी

रायपूर : "मेजर अभिनंदनला जसं पाकिस्तानातून सोडवून आणलं, तसेच माझ्या नवऱ्यालाही नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवून आणा"; अशी मागणी बेपत्ता जवानांच्या पत्नींनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.  शनिवारी छत्तीसगढमधील बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यापासून कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास बेपत्ता आहेत. बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात आहे असा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. नक्षलवाद्यांनी सोमवारी दोन स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात असून सुरक्षित असल्याचा दावा केला. त्यानंतर जवानाची पत्नी मिनू हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.  

राकेश्वर सिंह मनहास बेपत्त असल्याचं ऐकल्यापासून त्यांचं संपूर्ण कुंटुब दु:खात आहे. राकेश्वर सिंह जम्मू काश्मिरमधील रहिवाशी आहे. शनिवारी झालेल्ल्या हल्ल्यात एकूण २२ जवान हुतात्मा झाले, त्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे आठ जण असून कोब्रा कमांडो दलाचे सात कमांडो तर जिल्हा राखीव दलाचे ८ , विशेष कृती दलाचे ६ जणांचा समावेश आहे. एक जवान बेपत्ता असून त्यांचं नाव राकेश्वर सिंह मनहास असं आहे. 

राकेश्वर सिंह मनहास यांची पत्नी मिनू यांनी पंतप्रधान यांच्याकडे पतीला सोडवून आणण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, 'माझ्या पतीला माघारी बोलवा, जर ते सुरक्षित असतील तर माघारी आणा. जसं अभिनंदन यांना पाकिस्तानातून माघारी आणलं तसेच माझ्याही नवऱ्याला सोडवून आणा.' 

मिनू मनहास म्हणाल्या की,  शुक्रवारी रात्री साडे नाऊ वाजता माझं त्यांच्यासोबत शेवटचं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांनी ऑपरेशन ड्यूटीवर जाणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच उद्या आल्यानंतर बोलू, असेही म्हणाले होते. आता ते कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहे याबाबत काहीही कल्पना नाही. जी काही माहित मिळेल ती तुम्हाला देऊ असं कंट्रोल रूम वाले म्हणतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com