नेहरुंनी गोवामुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्यांना डावललं, वाऱ्यावर सोडलं: PM Modi

नेहरुंनी गोवामुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्यांना डावललं, वाऱ्यावर सोडलं: PM Modi

म्हापसा: गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर आले आहेत. म्हापसा येथील बोडगेश्वर मैदानावर त्यांची ही सभा होत आहे. गोवा विधानसभा निवडणुकांसाठी होणारे मतदान केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींची ही सभा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. (PM Narendra Modi address rally in Goa Mapusa)

नेहरुंनी गोवामुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्यांना डावललं, वाऱ्यावर सोडलं: PM Modi
Manipur Election 2022: बदलल्या मतदानाच्या तारखा; वाचा नव्या तारखा

म्हापशातील प्रसिद्ध देवस्थान बोडगेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या जाहीर सभेला सुरुवात केली. त्यांनी स्थानिक भाषेतून बोलायला सुरुवात केली. गोव्यात असतानाच माझी पंतप्रधान पदासाठी निवड झाल्याचं त्यांनी सांगितंलय. गोव्यात आल्यावर पर्रिकरांची आठवण येते. माझ्या कारकिर्दीची सुरुवात गोव्यातूनच झालीये. गोव्यातूनच काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली, असंही त्यांनी म्हटलंय. गोव्यातच आताही भाजपचं सरकार येणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय.

तसेच, भाजपच्याच कामांना वायद्यांच्या नावाखाली पुन्हा सांगितलं जातंय. त्याकाळी नेहरूंनी गोव्याला वाऱ्यावर सोडलं होतं. तशी घोषणा लाल किल्ल्यावरुन केली होती. कुठलीही मदत न देण्याची घोषणा केली. काँग्रेसनं गोवामुक्ती संग्राम संपवण्याचं काम केलं. तसेच गोव्याच्या मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्यांना मदत न करण्याचं नेहरुंनी सांगितलं होतं, असाही दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे.

गोवेकरांची ओळख म्हणजे कुठलंही काम अर्धवट न सोडणारे. काँग्रसने गोवामुक्ती संग्राम संपवण्याचं काम केलं काँग्रेसमुक्त भारत हा नागरिकांचा संकल्प आहे. गोव्यात 2019 नंतर पर्यटकांची संख्या 80 लाखांवर पोहोचली गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे.-मोदी

गोवा भाजपच्या सोबत आहे कारण गोव्यातील लोकांना आपलं कोण हे समजतं,आपला विकास कोण घडवणार हे गोवेकरांना माहिती आहे.

कॉंग्रेस गोव्यातील तरूणांची स्वप्न कदीच समजू शकला नाही. स्वातंत्र्यानंतरही गोवा 15 वर्ष कॉंग्रेसमुळे गुलामगिरीत होता.- मोदी

नेहरुंनी गोवामुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्यांना डावललं, वाऱ्यावर सोडलं: PM Modi
कारमधील सर्व सीटसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य : गडकरी

मी जेंव्हा गोव्यात होतो तेंव्हाच भाजपने मला प्रचार समितीचा प्रमुख बनवला होता. नंतर मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. गोव्याच्या या जमिनीची प्रेरणा होती की मला त्या दिवशी पर्रिकरांनी माझी सभा आयोजित करण्यात आली होती. तेंव्हा माझ्या तोंडून एक शब्द निघाला होता सहजपणे काँग्रेसमुक्त भारत. सहज निघालेला हा शब्द होता. मात्र, आपण पाहतोय की, आता हा शब्द देशातील कोट्यवधी लोकांचा संकल्प बनला आहे. गोव्याची आपली स्वत:ची एक खास संस्कृती आहे.

इथं जर चांगल्या सुविधा दिल्या नसत्या तर इथे पर्यटक आले असते का? त्यामुळेच भाजप सरकारने पायाभूत सुविधेच्या विकासासाठी नवं अभियान चालवलं आहे. उत्तर गोव्याचा विकास होत असेल तर दक्षिण गोव्याचाही विकास होणार. भाजपनं स्वयंपूर्ण गोव्याचं स्वप्न पाहिल्याचंही त्यांनी सांगितलंय. गोव्यातील प्रत्येक क्षेत्रात विकासाची गरज असून ते फक्त भाजप करु शकते, असंही त्यांनी म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com