कारमधील सर्व सीटसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य : गडकरी

अलीकडेच 8 प्रवासी वाहनांसाठी किमान 6 एअरबॅग्ज देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Car
Car Sakal

नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाहन उत्पादकांना कारमधील सर्व प्रवाशांसाठी 'थ्री-पॉइंट' सीट बेल्ट देणे बंधनकारक केले आहे. ज्यामध्ये मागील सीटच्या मध्यभागी बसलेल्या प्रवाशाला देखील सीट बेल्ट (Seat Belt) आवश्यक असणार आहे. याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, गाडीच्या मागच्या सीटवर मधल्या भागात बसलेल्या प्रवाशालाही ही व्यवस्था लागू असेल. दरम्यान, या नव्या नियमाबाबतची तरतूद असलेल्या फाईलवर बुधवारी स्वाक्षरी केल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार कार उत्पादकांना वाहनात बसलेल्या सर्व प्रवाशांना थ्री-पॉइंट सीट बेल्ट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Three Point Seat Belt For Cars )

Car
Hinganghat Burning Case : दोषी विकेशला जन्मठेपेची शिक्षा

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, देशभरात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी कार उत्पादकांचे आवश्यक नियम लागू करण्यात आले असल्याचे गडकरी म्हणाले. थ्री-पॉइंट सीट बेल्ट लॅप बेल्टपेक्षा सुरक्षित मानले जातात. ते प्रवाशांना विशेषत: कोणत्याही अपघाताच्या वेळी अधिक सुरक्षा प्रदान करतात. अलीकडेच, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक मसुदा मंजूर केला आहे, ज्यामध्ये कार उत्पादकांनी 8 प्रवासी बसू शकतील अशा वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग्ज देणे आवश्यक असल्याचे नमुद केले असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Car
आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स; नितीन गडकरींनी केलं सुतोवाच

याशिवाय वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, अडव्हान्स इमरजेंसी ब्रेकिंग सिस्टिम, वाहन चालक झोप लागल्यास अलर्ट सिस्टिम, लेन ड्रायव्हिंग वॉर्निंग सिस्टिम आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com