esakal | भारत बांग्लादेशचा सच्चा दोस्त; शिखर परिषदेत PM मोदी आणि PM शेख हसीना यांचा सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

india bangladesh

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात काल शिखर परिषदेत व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा झाली.

भारत बांग्लादेशचा सच्चा दोस्त; शिखर परिषदेत PM मोदी आणि PM शेख हसीना यांचा सहभाग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात काल गुरुवारी शिखर परिषदेत व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा झाली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या व्हर्च्यूअल संमेलनादरम्यान भारत आणि बांग्लादेशच्या दरम्यान हायड्रोकार्बन, कृषी, कापड, टेकनिक, खेळ आणि सार्वजनिक विकास अशा मुद्यांवर चर्चा होऊन सात करारांवा स्वाक्षऱ्या झाल्या. सोबतच चिलाहाटी-हल्दीबाडी रेल्वे संपर्क पुन्हा  प्रस्थापित करण्यासही परवानगी देण्यात आली. हा मार्ग 1965 पर्यंत सुरु होता मात्र भारत-पाकिस्तान युद्धानंतर बंद करण्यात आला होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले, बांगलादेश हा आमच्या 'नेबरहूड फर्स्ट पॉलिसी' चा प्रमुख स्तंभ आहे. बांग्लादेश सोबत संबंध अधिक दृढ करणे ही माझी पहिल्यापासूनच प्राथमिकता राहिलेली आहे. जागतिक महामारीमुळे हे कठीण होतं हे खरंय. मात्र, या कठीण समयी देखील भारत आणि बांग्लादेशच्या दरम्यान चांगले सहकार्य राहिलेले आहे. 

हेही वाचा - दिल्लीसह एनआरसी भूकंपाने हादरली; 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के

लशीच्या क्षेत्रात देखील आमच्या दरम्यान चांगले सहकार्य सुरु आहे. याबाबतीत देखील आम्ही आपल्या गरजांकडे विशेष लक्ष देऊ. यावर शेख हसीना म्हणाल्या की, भारत एक खरा मित्र आहे. कोविड-19 विरोधातील भारताच्या लढ्याचे मी कौतुक करते. आशा करते की जागतिक अर्थव्यवस्थेला अधिक चांगले बनवण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण योगदान देईल. कोरोनामुळे झालेले आर्थिक आणि सामाजिक परिणाम दूर करण्यासाठी आपल्या सरकारनेही 14.14 अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे, असेही हसिना म्हणाल्या.

या शिखर परिषदेत महात्मा गांधी आणि बंगबंधु यांच्यावरील डिजीटल प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ही भाग्याची गोष्ट असल्याचं मोदींनी म्हटलं. मोदींनी हसीना यांना म्हटलं की, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की, आज आपल्यासोबत बंगबंधुच्या सन्मानार्थ पोस्टाच्या एका तिकीटाचे उद्घाटन करता आले. मी आशा करतो की महात्मा गांधी आणि बंगबंधुवरील हे प्रदर्शन युवकांना प्रेरणा देईल. बांग्लादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी मार्चमध्ये ढाका येथे जाणार आहेत. मोदी यांनी ट्विट करुन म्हटलंय की, पुढच्या वर्षी भारत आणि बांग्लादेश संयुक्त विद्यमाने मुजीब बोरषो साजरा करतील. मी बंगबंधुंना श्रद्धांजली वाहण्यासाठी ढाक्याला जाणार आहे.
 

loading image
go to top