
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी७ शिखर परिषदेत सहभागी झाले असून परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, व्यापार आणि विकासाच्या मुद्द्यावर जगभरातील नेत्यांशी संवाद साधला. कॅनडाच्यचा कनानस्किसमध्ये जी७ परिषदेचं आय़ोजन करण्यात आलंय. या परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दहशतवादाविरोधातील कठोर धोरणाचा पुनरुच्चार केला. दहशतवाद हा जागतिक धोका असून त्याच्याविरोधात एकत्र येऊन कारवाईची गरज असल्याचं मोदी म्हणाले.