
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांसाठी गेल्या तीन वर्षात किती खर्च झाला याची माहिती संसदेत देण्यात आली. परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा यांनी राज्यसभेत लेखी उत्तर दिलंय. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाबाबत प्रश्न विचारला होता.