PM Modi Temple: असे मंदिर जिथे सकाळ-संध्याकाळ होते पंतप्रधान मोदींची पूजा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकार

Hindi Mata Temple: या मंदिराला भेट देण्यासाठी अनेक लोक येत असतात. इतकेच नव्हे तर हे लोक दररोद सकाळ आणि संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुर्तीची पूजा करत असतात.
PM Modi Temple
PM Modi Templeesakal

आपल्या आवडत्या नेत्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. आणि जर तो चाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असलेल बोलयचच नाही. कारण पंतप्रधान मोदींची लोकप्रियताच तितकी आहे. लोकसभा निवडणुका सुरू आहेत. नेते मंडळी प्रचारात गुंतली आहे तर कार्यकर्ते आमचाच नेता कसा भारी आणि पॉवरफुल आहे. हे दाखवण्यात मागे नाहीत.

दरम्यान मध्य प्रदेशातील ग्वालियरच्या सत्यनारायण टेकडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंदिर असल्याचे आणि रोज सकाळ-संध्याकाळ त्यांची आरती होत असल्याचे खूप कमी जणांना माहित असेल. इतकेच नव्हे तर या मंदिरात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची मूर्तीसुद्धा आहे.

मूर्तीकार प्रमोद विश्वकर्मा यांनी बनवलेली पंतप्रधानांची ही मूर्ती दिड फूट उंच आहे. या मंदिरात आधिपासून वसुंधराराजे सिंधिया आणि माजी पतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याही मूर्ती आहेत.

या मंदिराला भेट देण्यासाठी अनेक लोक येत असतात. इतकेच नव्हे तर हे लोक दररोद सकाळ आणि संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुर्तीची पूजा करत असतात.

PM Modi Temple
पोर्शे अपघातानंतर धक्कादायक घटना समोर; दोघांना कारखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला 6 महिन्यांनी अटक

या मूर्तीची स्थापना 14 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आली होती. त्यावेळी अखिल भारतीय युवा वक्ता मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सिंह चौहान यांनी हिंदी दिवसानिमित्त मंदिरात पंतप्रधानांचा पुतळा बसवून त्यांचा सन्मान केल्याचे सांगितले होते.

अटल बिहारी वाजपेयी, विजयराजे सिंधिया आणि पंतप्रधान मोदी यांसारख्या नेत्यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये हिंदीत भाषणे देऊन जागतिक स्तरावर हिंदी भाषेचा दर्जा उंचावला आहे. म्हणूनच, हिंदी भाषेशी बांधिलकी असलेल्या नेत्यांचा सन्मान केल्याचे ते म्हणाले होते.

PM Modi Temple
PM Modi: देवानेच मला पाठवलंय, कारण माझ्यातील शक्ती ही दैवी आहे; पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com