Modi News: पंतप्रधान आजपासून गुजरात, मध्यप्रदेश दौऱ्यावर; निवडणुकीच्या अनुषंगाने दौऱ्याला महत्त्व

कसा असेल पंतप्रधान मोदी यांचा दौरा?
PM Narendra Modi News
PM Narendra Modi Newsesakal

नवी दिल्लीः येत्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. ९ ते ११ ऑक्टोबर, असा पंतप्रधानांचा दौरा असेल. याच दरम्यान ११ ऑक्टोबर रोजी उज्जैन येथील महाकाल मंदिरातील 'महाकाल लोक'चं लोकार्पण मोदी करतील.

या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटनदेखील होणार आहे. गुजरातमधील १४ हजार ५०० कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ ते करतील. त्यामुळे महाकालेश्वर यात्रेला जाणाऱ्या भाविकांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे विशेष अर्थाने पाहिलं जात आहे. अधिक माहितीनुसार पंतप्रधान मेहसाणा येथील मोढेरा येथे अनेक योजनांचं उद्घाटन करणार आहेत. शिवाय दोन मंदिरांमध्ये पूजाअर्जा करणार आहेत.

PM Narendra Modi News
LIVE Update: ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक, पुढील रणनीती ठरवणार!

सोमवारी भरुच येथील अमोद, अहमदाबाद आणि जामनगर येथेसुद्धा अनेक विकास योजनांचा शुभारंभ होईल. याबरोबर अहमदाबाद येथील सरकारी रुग्णालय परिसरात ७१२ कोटी रुपयांच्या आरोग्य सुविधांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री किडनी रिसर्च सेंटरद्वारे ४०८ कोटी रुपयांच्या रुग्णालयाचे लोकार्पण पंतप्रधान यांच्या हस्ते होईल. यासह विविध कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे.

PM Narendra Modi News
माझा जन्म कृष्ण जन्माष्ठमीचा, देवानं मला विशेष मोहिमेवर गुजरातला पाठवलंय - केजरीवाल

११ ऑक्टोबर रोजी महाकाल मंदिरातील 'महाकाल लोक'चं लोकार्पण मोदी करणार आहेत. उज्जैन येथे एक पंतप्रधानांची सभादेखील होणार आहे. येथे पंतप्रधानांनी तीन तासांची वेळ दिलेली आहे. पंतप्रधांच्या सुरक्षेसाठी इंदोर विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून त्यासाठी एअरफोर्स आणि एसपीजीचे अधिकारी इंदोर येथे अगोदरच दाखल झालेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com