पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना PM मोदींची आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंना PM मोदींची आदरांजली

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज जयंती आहे.

पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंना PM मोदींची आदरांजली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज जयंती आहे. नेहरुंची 133 वी जयंती असून त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरुंच्या जयंतीनिमित्त ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.

लहान मुलं हीच देशाची खरी ताकद असल्याचं नेहरु मानत होते. त्यांचे लहान मुलांवर असलेलं प्रेम यामुळेच त्यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा करण्यात येतो. नेहरुंच्या निधनाआधी भारतात २० नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जात होता. संयुक्त राष्ट्राने याच दिवसाला जागतिक बालदिन असं घोषित केलं होतं. मात्र नेहरुंच्या निधनानंतर भारातातील बालदिनाची तारीख नेहरुंची जंयती निवडण्यात आली. यासाठी भारतीय संसदेत एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

हेही वाचा: नेहरूंचा वैज्ञानिक द्रष्टेपणा

बालदिन साजरा करण्याचा उद्देश हा नेहरुंना श्रद्धांजली वाहण्याशिवाय लहान मुलांचे अधिकार, त्यांचे पालन पोषण आणि शिक्षणाबद्दल जनजागृती निर्माण करणे हा होता. नेहरुंच्याच शब्दात सांगायचे तर आजची मुलं ही उद्याचा भारत निर्माण करणार आहेत आणि ज्यापद्धतीने आपण त्यांना घडवू त्यानुसारच देशाचं भविष्य ठरेल.

loading image
go to top