
अमरनाथ ढगफुटीवर PM मोदींचं ट्विट; दिले महत्वाचे आदेश
नवी दिल्ली : अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीच्या घटनेत आत्तापर्यंत दहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर तीन जणांचा जीव वाचवण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं असून प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले आहेत. (PM Modi tweet on cloudburst in Amarnath Important orders given to administration)
PM मोदींनी ट्विट केलं की, "श्री अमरनाथ गुहेजवळ ढग फुटची घटना घडल्यानं मी व्यथीत झालो आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या शोकग्रस्त कुटुंबियांप्रती मी सांत्वना व्यक्त करतो. या दुर्घटनेबाबत मदतकार्य वेगानं व्हावं याबाबत मी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी बोललो आहे. त्या या परिस्थितीचा आढावा घेतला असून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे"
हेही वाचा: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी! १० जणांचा मृत्यू - NDRF
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमरनाथ गुहेजवळचं ढगफुटी झाली. या घटनेनंतर उंचावरील भागातून वाहत आलेला पाण्याचा लोंढा हा अमरनाथ गुहेजवळून वाहत आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १० जणांचे मृतदेह हाती आले आहेत. या ठिकाणी NDRF आणि SDRF च्या तुकड्यांनी मदतकार्य सुरु कलं आहे.
हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेमुळे भुजबळ निशाण्यावर; बंडखोरांना दिलं उत्तर
दरम्यान, ३० जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून सध्या या यात्रेसाठी आलेले १० ते १२ हजार भाविक या गुहेच्या परिसरात वास्तव्याला आहेत. या घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटोही समोर आले आहेत.
Web Title: Pm Modi Tweet On Cloudburst In Amarnath Important Orders Given To Administration
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..