...म्हणून, स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर ध्वजारोहन

PM Modi unfurls tricolour at Red Fort to mark Azad Hind Government anniversary
PM Modi unfurls tricolour at Red Fort to mark Azad Hind Government anniversary

नवी दिल्ली- आज आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला आज 75 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमीत्त आज लाल किल्यावर स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच ध्वजारोहन करण्यात आले. देशाचे स्वांतत्र्य हा नेताजींचा एकच हेतू होता, हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच येथे ध्वजारोहन केले.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, देशाचे स्वांतत्र्य हा नेताजींचा एकच हेतू होता. हीच त्यांची विचारधारा होती. भारताने आजवर अनेक क्षेत्रात प्रगती केली असली तरी अद्याप नव्या उंचीवर पोहोचणे बाकी आहे. हेच लक्ष गाठण्यासाठी आज भारताचे लोक नव्या भारताचा संकल्प घेऊन पुढे जात आहेत आणि खरंतर या भारताची कल्पना सुभाष बाबूंनी केली होती.

लाखो जणांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की हे आपण जपले पाहिजे. गेल्या 4 वर्षांत सरकारने केलेल्या कामाचा पाढाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाचला. देशाचे संरक्षण खातं मजबूत करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com