
Modi Appeals for Calm in Manipur Highlights Need for Stability for Growth
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पंतप्रधान मोदी मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा दौरा करणार आहेत. यात आज पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये पोहोचले आहेत. मणिपूरमध्ये त्यांनी विविध विकासकामांची पायाभरणी केली. यावेळी मणिपूरमध्ये अलिकडच्या काही वर्षात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना आणि परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. राज्यात विकास करायचा असेल तर शांतता राखणं गरजेचं असल्याचं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं.