कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस सर्वांनी घ्या; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन | Pm modi urges people to take precautionary doses of anti covid 19 vaccine | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prime Minister Narendra Modi Convey Best Wishes To Indian Contingent Of Commonwealth Games

कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस सर्वांनी घ्या; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुवारी कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील धरमपूर येथील २५० खाटांच्या रुग्णालयाचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केलं. यावेळी मोदींच्या हस्ते रामचंद्र मिशनच्या विविध योजनांचंही उद्घाटन केलं. (Pm modi urges people to take precautionary doses of anti covid 19 vaccine)

हेही वाचा: RSS ने तिरंग्याच्या रंगांना अशुभ म्हटलेलं तुम्हाला मान्य आहे का? ओवेसींचा सवाल

मोदी म्हणाले की, मी सर्वांना आवाहन करतो की, कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस सर्वांनी घ्यावा. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सानिमित्त सरकारने ७५ दिवस बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचही त्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातील, गावातील आणि आजुबाजूच्या सर्वांना बुस्टर डोस घ्यावा यासाठी प्रयत्न करायला हवे, असंही मोदींनी नमूद केलं.

मोदी पुढं म्हणाले की, भारत आज जे आरोग्य धोरण राबवत आहे ते प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी निगडीत आहे. देशात केवळ लोकांसाठीच नाही तर प्राण्यांसाठीही देखील देशव्यापी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. शिवाय केंद्र सरकार देशातील मुलींच्या प्रगतीच्या मार्गातील प्रत्येक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा: हम डरेंगे नही, फाईट करेंगे! ....आणि आता खर्गेंनाही ईडीचं `आवतण'

रामचंद्र मिशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे 200 कोटी रुपये खर्चून बांधलेले श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल लोकांना विशेषत: दक्षिण गुजरात प्रदेशात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरवेल. मोदींनी श्रीमद राजचंद्र अ‍ॅनिमल हॉस्पिटल आणि 'श्रीमद राजचंद्र सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर वुमन'ची पायाभरणीही केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) गुजरात युनिटचे अध्यक्ष सी.आर. पाटील यावेळी उपस्थित होते.

Web Title: Pm Modi Urges People To Take Precautionary Doses Of Anti Covid 19 Vaccine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..