Narendra Modi Aircraft : मोदींंसाठी आहे चक्क 4500 कोटींचं विमान; असं काय आहे खास? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Aircraft

Narendra Modi Aircraft : मोदींंसाठी आहे चक्क 4500 कोटींचं विमान; असं काय आहे खास?

Narendra Modi Aircraft : सुरक्षा ही प्रत्येक देशाची प्राथमिकता असते. सुरक्षिततेचा मुद्दा हा तेव्हा जास्त महत्त्वाचा वाटतो जेव्हा देशातील मोठ्या राजकीय व्यक्तींची गोष्ट येते. या राजकीय व्यक्तींमध्ये जसे की पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा अन्य मोठे नेते. हे लोक क्षणोक्षणी सुरक्षित असावे, याची पुरेपुर काळजी घेतली जाते.

इतिहासात अशी बरीच उदाहरणे आहे की सुरक्षेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अनेक लोकांनी जीव गमावला. यावर भारतातीलचं एक उदाहरण म्हणजे राजीव गांधी यांची हत्या. यामुळे भारत नेहमीच पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी घेत असतो. (PM Modi Uses Rs 4500 Crore VVIP Air India One aircraft read story )

पंतप्रधान मोदी कोणतं विमान वापरतात?

भारताने त्यामुळेच VVIP एअरक्राफ्टला Indian Head of State च्या सुरक्षेमध्ये सहभागी केले आहे. असाच एक एअरक्राफ्ट आहे एअर इंडीया वन. 4500 कोटींचा बनलेला हा एअरक्राफ्ट देशाचे पंतप्रधानांसाठी खास बनवला आहे. हा एअरक्राफ्ट इतका सुरक्षित आहे की जमीनीपासून हवेत झालेल्या कोणत्याही हमल्याला उत्तर देऊ शकतो.

हेही वाचा: Narendra Modi : यातील नक्की काय काय पूर्ण झालं?

एअर इंडीया वन विषयी जाणून घ्या

एअर इंडीया हा एअरक्राफ्ट देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या हवाई दौऱ्यांसाठी वापरला जातो. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या एअरक्राफ्टचा वापर त्यांच्या देशा अंतर्गत आणि विदेशी दौऱ्यासाठी करतात.

या एअरक्राफ्टच्या सोयी सुविधा इतक्या भारी आहेत की अन्य देशही या एअरक्राफ्टकडे आकर्षित होतात. यामुळेच या एअरक्राफ्टची तुलना युएस प्रेसिडेंटच्या एअरफोर्सशी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हे एअरक्राफ्ट PMO प्रमाणे आहे. ज्यामध्ये बसून ते कोणतेही काम, मीटींग्स सहज अटेंड करू शकता.

हेही वाचा: Airforce Agniveer : हवाई दलात 'अग्निवीर' होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा

असं म्हणतात की भारताकडे जेव्हा 747-400 Jumbo Jet सारखा एअरक्राफ्ट असताना एअर इंडीया वनची गरज का भासली आहे. तर यामागे कारण म्हणजे एअर इंडीया वनकडे असलेली हायटेक सुरक्षा. सुरक्षेच्या दृष्टीने एअर इंडीया वन 747-400 Jumbo Jet पेक्षा अधिक सुरक्षित आहे.

एअरक्राफ्टची फ्युअल कॅपिसटी जास्त चांगली आहे भारताकडे आता दोन एअर इंडीया वन एअरक्राफ्ट आहे तर हे एअरक्राफ्ट एअर इंडीयाचे पायलट नाही तर इंडीया एअर फोर्सचे पायलट चालवतात.

हेही वाचा: Narendra Modi : आता मोदी देणार विद्यार्थ्यांना पास होण्याचे धडे!

या एअरक्राफ्टला टिकेचाही सामना करावा लागला कारण या एअरक्राफ्टच्या एका तासाच्या प्रवासाला एक करोड तीस लाख रुपये खर्च येतो. देशाच्या या महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, हे लक्षात घेणेही गरजेचे आहे.