
Narendra Modi : आता मोदी देणार विद्यार्थ्यांना पास होण्याचे धडे!
Modi Pariksha Par Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात' कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहे. मोदींच्या प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते.
हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
हेही वाचा: Indian Science Congress : 2015 पर्यंत भारत 81 व्या क्रमांकावर होता, आता 40 व्या क्रमांकावर आहे - PM मोदी
एवढेच नव्हे तर, मोदींचे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत करोडो चाहते आहेत. त्यामुळे मोदी जे मार्गदर्शन करतात त्याची त्वरेने अमलबजावणी केली जाते. मोदींच्या 'चाय पे चर्चा'ला देखील उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता मोदी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
आगामी काळात देशभरात परिक्षांचा हंगाम चालू होणार आहे. त्यासाठी अनेक विद्यार्थी अभ्यासाला लागले आहे. हीच बाब लक्षात घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
येत्या २७ जानेवारी २०२३ रोजी 'परीक्षा पे चर्चा' चे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये पंतप्रधान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. शिक्षण मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
हेही वाचा: Nana Patole | परीक्षा पे चर्चा, पण महागाईवर चर्चा कधी मोदीजी ? : नाना पटोले
पंतप्रधान दरवर्षी 'परीक्षा पे चर्चा'च्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतात. यादरम्यान, पंतप्रधान विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी तणावमुक्त कसे राहावे याचा कानमंत्र देत असतात. त्यामुळे येत्या २७ जानेवारी रोजी मोदी विद्यार्था, पालक आणि शिक्षकांना नेमका काय मंत्र देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.