
देशातील काही राज्यांमधील शेतकऱ्यांना प्रश्न विचारले. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल का असंही मोदींनी विचारलं.
नवी दिल्ली - पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशभरातील 9 कोटी खात्यांवर पाठवण्यात आला. यावेळी पंतप्रधान 6 राज्यांमधील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. मोदींनी शेतकऱ्यांना प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
Updates -
महाराष्ट्रातील लातुरमधील शेतकऱ्याशी मोदींनी यावेळी संवाद साधला. तुम्ही शेतीशिवाय इतर काय करता? या उत्पन्नामध्ये तुमचा उदरनिर्वाह होतो का असे प्रश्न मोदींनी विचारले.
याशिवाय देशातील काही राज्यांमधील शेतकऱ्यांना प्रश्न विचारले. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल का असंही मोदींनी विचारलं.
हे वाचा - शेतकऱ्यांशी संवादावेळी पंतप्रधान मोदींची ममतांवर टीका;लातूरच्या शेतकऱ्यांचाही उल्लेख
शेतीत जंगली प्राण्यांकडून होणारी नासधूस थांबवण्यासाठी उपाय व्हायला हवेत असं एका शेतकऱ्याने सांगितलं. तेव्हा मोदी म्हणाले की, सध्या जसे शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली चाललं आहे तसंच काही पर्यावरणाच्या नावावर केलं जातं. त्यामुळे या कामात अडचण येते.
Working for the welfare of our hardworking farmers. #PMKisan https://t.co/sqBuBM1png
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2020
पंजाबमधील शेतकऱ्यांना का भडकावताय? मोदींचा सवाल
- देशात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
- अल्पभूधारकांना पाणी, वीज मिळत नव्हते, पिकवलेला माल विकताना दमछाक व्हायची.
- पीक विमा योजनेचा लाभ लहान शेतकऱ्यांना मिळत नव्हता.
- ज्याच्याकडे जास्त जमीन नव्हती, साधने नव्हती त्यांचे खूप नुकसान झाले.
-वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या लोकांमुळे जितका विकास शेतकऱ्यांचा व्हायला हवा होता तो झाला नाही.
- सर्व शेतकऱ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. ख्रिसमसचा हा सण जगात प्रेम , शांतीचा प्रसार करूदे
हे वाचा - ममतांमुळे बंगालचे 70 लाख शेतकरी 'सन्मान योजने'पासून वंचित; PM मोदींचा घणाघात
- अटलजींनी गितेच्या संदेशानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला. अटलजींनी त्यांचं पूर्ण जीवन राष्ट्रासाठी वाहून घेतलं. सुशासन भारताच्या राजकारणाचा त्यांनी भाग बनवलं.
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सर्व शिक्षा अभियान यांसारख्या योजना त्यांनी सुरु केल्या. आज देश त्यांना अभिवादन करत आहे.
- दिल्लीपासून ज्या गरिबांसाठी पैसे दिले जातात ते थेट त्यांच्याकडे जातात. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना हे त्यातलंच एक उदाहरण आहे.