शेतकऱ्यांशी संवादावेळी पंतप्रधान मोदींची ममतांवर टीका;लातूरच्या शेतकऱ्यांचाही उल्लेख

टीम ईसकाळ
Friday, 25 December 2020

नव्या कृषी कायद्या संदर्भात शेतकऱ्यांनी यावेळी पंतप्रधानांना काही शंका विचारल्या.यावेळी पंतप्रधान मोदी यांन पश्चिम बंगाल सरकारवर टीका करत तेथील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेरणी करण्याचा प्रयत्न केला. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता आज, 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील सहा राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नव्या कृषी कायद्या संदर्भात शेतकऱ्यांनी यावेळी पंतप्रधानांना काही शंका विचारल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांन पश्चिम बंगाल सरकारवर टीका करत तेथील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेरणी करण्याचा प्रयत्न केला. 

ममतांमुळे बंगालचे 70 लाख शेतकरी 'सन्मान योजने'पासून वंचित; PM मोदींचा घणाघात

काय म्हणाले नरेंद्र मोदी?
पश्चिम बंगालमधील 70 लाख शेतकरी बांधवांना आज, योजनेचा लाभ मिळाल नाही, याचं मला दुःख वाटतंय. बंगालमधील 23 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. परंतु, राज्य सरकारने शेतकऱ्यांची शहःनिशा करण्याची प्रक्रियाच थांबवली होती. 

ममता बॅनर्जी, यांचे विचार बंगालचा नाश करत आहेत. त्यांच्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे मला खूप वेदना झाल्या आहेत. यावर विरोधक गप्प का आहेत?

'विरोधक दिशाभूल करताहेत; MSP ची व्यवस्था तशीच राहिल'

पश्चिम बंगालमध्ये कोणतेही राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाहीत. त्या पक्षांनी दिल्ला यावं आणि शेतकऱ्यांसंदर्भा चर्चा करावी. जे राजकीय पक्ष आणि नेते एपीएमसी संदर्भात बोलत आहेत. त्यांनी केरळकडे पहावं, केरळमध्ये कृषी उत्पन्न बाजारसमित्या नाहीत. शेतकऱ्यांनी कधीही तेथे आंदोलन केलेले नाही. 

केरळमधील शेतकरी केवळ सेल्फी काढण्यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले - PM मोदी

आसाम, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच पंचायत निवडणुका झाल्या. त्यात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी मतदान केले आहे म्हणजे, त्यांना विरोधक करत असलेली दीशाभूल लक्षात आली आहे. 

आपण नव्या कायद्यात आणखी शेती उत्पादनांना किमान आधारभूत किंमत (हमीभाव-एमएसपी) मिळवून देत आहोत. यापूर्वी काही ठराविक पिकांनाच किमान आधारभूत किंमत मिळत होती. 

 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार आपण, पिकांना दीडपट किमान आधारभूत किंमत (हमीभाव) देत आहोत. 

महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागलं होतं. परंतु, पंतप्रधान पिक विमा योजनेचा त्यांना लाभ मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi addresses farmers pm kisan installment mamata banarjee latur maharashtra