
तरुणांनी 'रेवडी संस्कृती'पासून सावध राहिलं पाहिजे: PM मोदी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुंदेलखंड एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणले पूर्वी यूपीची कनेक्टिव्हिटी खूपच खराब होती. कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली होती, पण योगीजींनी यूपीचं चित्र बदलून टाकलं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. (PM Narendra modi News in Marathi)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल आपल्या देशात मोफत रेवडी वाटून मते गोळा करण्याची संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही रेवडी संस्कृती देशाच्या विकासासाठी अत्यंत घातक आहे. देशातील जनतेला या रेवडी संस्कृतीपासून खूप सावध राहावे लागेल.
पीएम मोदी पुढं म्हणाले की, बुंदेलखंडच्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरही बांधले जातील. जलसुरक्षेसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हे खूप मोठे काम आहे. खेळणी बनवणे हा भारतातील पारंपरिक व्यवसाय आहे. मी खेळणी उद्योगांना नव्याने काम करण्याचे आवाहन केले होते. लोकांना भारतीय खेळणी खरेदी करण्याचे आवाहनही करण्यात आळ्याचे त्यांनी म्हटलं.
हेही वाचा: CM एकनाथ शिंदेंच्या कॉलमुळे MPSC च्या ४०० जागा वाढणार
पीएम मोदी म्हणाले की, या मिशन अंतर्गत बुंदेलखंडमधील लाखो कुटुंबांना पाण्याची जोडणी देण्यात आली आहे. आमच्या माता भगिनींना याचा खूप फायदा झाला आहे. बुंदलेखंडमधील नद्यांचे पाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असल्याचं मोदींनी नमूद केल.
Web Title: Pm Modi Visit Bundelkhand With Yogi Adityanath
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..